थकीत ऊस बिलांबाबत भाकियूचे साखर कारखान्यासमोर आंदोलन

शामली : बजाज साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ३५९.७२ कोटी रुपये थकीत असल्याच्या विरोधात भाकियूने निदर्शने केली. संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याच्या सर व्यवस्थापकांना अनेक तास आपल्यासोबत बसवून ठेवले. नंतर भाकीयू पदाधिकारी व प्रशासनात झालेल्या चर्चेनंतर लवकरच बिले देण्याचे आश्वासन देण्यात आले.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भाकियू टिकैत गटाचे जिल्हाध्यक्ष कालेंद्र मलिक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बजाज साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन केले. कारखान्याने यंदा १२७.२४ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. तर कारखान्याकडे ३५९.७२ कोटी रुपये थकीत आहेत. आंदोलनकर्त्यांनी कारखान्याचे सरव्यवस्थापत लेखराल सिंह यांनाही अनेक तास बसवून ठेवले. यावेळी राजू ठाकूर, शक्ती सिंह, श्रीपाल सिंह, हाजी रईस, मंगे राम सैनी, राधेश्याम आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here