छत्रपती संभाजीनगर : ‘संत एकनाथ’ कारखान्याची जप्त मालमत्ता लिलावात, निविदा प्रक्रिया सुरू

छत्रपती संभाजीनगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपी प्रश्नावर महसूल प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची जप्त केलेली मालमत्ता विक्रीसाठी काढण्यात आली असून, तहसील प्रशासनाने यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या लिलावातून वसूल होणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या थकीत देयकांसाठी वापरली जाणार आहे. कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी चेअरमन सचिन घायाळ यांच्याविरोधात आर्थिक घोटाळ्याचे आरोप असून ते फरार आहेत. शेतकऱ्यांच्या पैशांची वसुली करणारी ही प्रक्रिया आता काय निकाल देते, याकडे संपूर्ण पैठण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कारखान्याकडे पैसे थकल्याने हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने कारखान्याची जंगम मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्तेच्या विक्रीची प्रक्रिया २५ ते २९ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. याबाबत तहसीलदार ज्योती पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलावात सुमारे १ लाख ३४ हजार ६५८ क्विंटल साखर, १ हजार ८०० मेट्रिक टन मोलॅसिस, बैलगाड्या, चार ट्रॅक्टर (दोन चालू, दोन बंद) आणि इतर यंत्रसामग्रीचा समावेश आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here