छत्रपती संभाजीनगर : थकीत ऊस बिलाप्रश्नी ‘स्वाभिमानी’चा पैठण तहसील कार्यालयासमोर ठिय्या

छत्रपती संभाजीनगर : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी थकीत ऊस बिलांप्रश्नी आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केले. गळीत हंगामातील ऊस बिले अद्याप न मिळाल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी पैठण तहसील कार्यालयासमोर रोष व्यक्त केला. ऊस नियंत्रण कायद्यानुसार १४ दिवसांत पेमेंट देणे असताना बंधनकारक कारखानदारांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. आता १५ टक्के व्याजासह रक्कम देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. आंदोलनानंतर तहसीलदार ज्योती पवार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव मुळे यांनी प्रशासन व साखर कारखानदारांविरोधात हल्लाबोल केला. ते म्हणाले की, तालुक्यातील व बाहेरील साखर कारखान्यांनी गाळपासाठी ऊस नेऊन तीन ते चार महिने उलटले तरी शेतकऱ्यांना देयके मिळालेली नाहीत. विशेषतः संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडे मोठी थकबाकी असून, कारखान्यावर जप्तीची कारवाई होऊनही शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांकडे दुर्लक्ष होत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, पवन शिसोदे, सुभाष नवथर, एकनाथ दसपुते, राजू शहा, साईनाथ कर्डिले, अनिल राऊत, किशोर सदावर्ते आणि किशोर शिरवत यांची प्रमुख उपस्थिती होती.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here