छत्रपती संभाजीनगर : श्री संत एकनाथ कारखान्याचे माजी चेअरमन सचिन घायाळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सचिन घायाळ यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. कारखान्याची खोटी कागदपत्रे तयार करून १६ कोटी ६२ हजार रुपयांचे कर्ज उचलून कारखाना व सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांनी शुक्रवारी (ता. ८) हा निकाल दिला.

जिल्हा विशेष लेखा परीक्षक सुरेश पंडित काकडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार, कारखान्याचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणाच्या नावाखाली कारखान्याची मालमत्ता बुलडाणा अर्बन बँकेकडे तारण ठेवण्यात आली होती. मात्र, हे कर्ज उभारताना घायाळ यांनी जाणीवपूर्वक बनावट आणि दिशाभूल करणारी कागदपत्रे तयार केली. उचललेले कर्ज कारखान्यासाठी न वापरता त्याचा अपहार करून सभासदांचा विश्वासघात केल्याचा ठपका पैठण एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदवली. आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, साक्षीदारांवर दबाव येण्याची भीती लक्षात घेता, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here