छत्रपती संभाजीनगर : ऊस, मका पिकाची रानडुकरांकडून नासधूस; शेतकरी त्रस्त

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदी पट्ट्यातील ममदापूर, अगर कानडगाव, नेवरगाव, बगडी, जामगाव, कायगाव आणि धानोरा या गावांमध्ये रानडुकरांचा सर्वाधिक धुमाकूळ सुरू आहे. डुकरांचे कळप उसाची उभी पिके जमिनीवर आडवी पाडत असून, मक्याची कणसे फस्त करत आहेत. या गावांमधील शेतकरी रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे कमालीचे त्रस्त झाले असून त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी कळपाने येणारी रानडुकरे शेतात घुसून ऊस आणि उन्हाळी मका पिकाची नासधूस करत आहेत. वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी पदरमोड करून शेताभोवती तारेचे कुंपण घालणे, ‘झटका मशीन’ लावणे यांसारखे उपाय केले; मात्र झुंडीपुढे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत. बाजारपेठेत आधीच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसताना आता हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. वनविभागाने केवळ बघ्याची भूमिका न घेता रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here