गाळप हंगाम २०२५-२६ : देशात अद्याप 12,779 कोटी रुपयांची ऊस बिले थकीत, शेतकरी आर्थिक अरिष्टात

कोल्हापूर : केंद्र सरकारने मंगळवारी एफआरपीत प्रतिटन १०० रुपयांची वाढ करत देशातील कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली असली तरी दुसरीकडे देशात २०२५-२६ मधील एक लाख १२ हजार ७४० कोटींपैकी सुमारे ८८.६ टक्के रक्कम (९९ हजार ९६१ कोटी) २० एप्रिल २०२६ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. याचाच अर्थ देशात अद्याप 12,779 कोटी रुपयांची ऊस बिले थकीत असून शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडले आहेत. २०२४-२५ हंगामात्तील ९९.५ टक्के देणी पूर्ण झाली आहेत.केंद्र आणि राज्य सरकारे शेतकऱ्यांना वेळेवर बिले मिळवीत यासाठी प्रयत्नशील असली तरी सर्वच कारखाने वेळेवर ऊस बिल देण्यात अपयशी ठरली आहेत.

दरम्यान, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आगामी २०२६-२७ गाळप हंगामासाठी एफआरपीत प्रतिटन १०० रुपयांची वाढ केली आहे. २०२५-२६ हंगामासाठी एफआरपी ३५५० होती. ती आता ३६५० रुपये इतकी केली आहे. १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी ही रक्कम उत्पादकांना मिळेल. कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार हा दर निश्चित करण्यात आला आहे.एक ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या नवीन हंगामात सर्व साखर कारखान्यांना हा नवा दर लागू करणे बंधनकारक आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

पुढील हंगामासाठी उसाचा सरासरी उत्पादन खर्च १८२० रुपये प्रतिटन इतका गृहित धरला आहे. जाहीर ३६५० रुपयांची एफआरपी उत्पादन खर्चाच्या तुलनेत १००.५ टक्के अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, असे केंद्राने म्हटले आहे. सध्याच्या २०२५-२६ साखर हंगामाच्या तुलनेत ही वाढ २.८१ टक्क्यांनी अधिक आहे. याचा देशातील पाच कोटी ऊस उत्पादकांना फायदा होईल, असे सांगण्यात आले. ज्या साखर कारखान्यांची रिकव्हरी ९.५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रतिटन ३३८० रुपये हमखास मिळणार आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here