उत्तराखंडमधील साखर कारखान्याकडून थकबाकी भागवण्याची मागणी

गोहाना, हरियाणा: राज्यातील शेतकर्‍यांद्वारे जवळपास तीन वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील साखर कारखान्यामध्ये ऊस घालण्यात आला होता. शेतकर्‍यांना ऊसाची थकबाकी अजूनही भागवलेली नाही. भाकियू प्रदेश उपाध्यक्ष सत्यवान नरवाल यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी लघुसचिवालय पोहचले आणि नायब तहसिलदार सतीश कुमार यांना मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्या नावाने मागणी पत्र सुपुर्द केले.

सत्यवान नरवाल यांनी सांगितले की, 2016-17 गाळप हंगामामध्ये शेतकर्‍यांनी उत्तराखंडातील ईकबालपूर स्थित साखर कारखान्यामध्ये ऊस घातला होता. तीन वर्षे झाली आहेत, पण कारखान्याने पैसे दिलेले नाहीत. जवळपास 40 करोड रुपये कारखान्याकडे देय आहे. तर गेल्या वर्षी तांदळाच्या पीकाचे नुकसान झाले होते. विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांचे करोडो रुपये देय आहेत. पीक विमा कंपन्या आणि साखर कारखान्याने सात दिवसांमध्ये नुकसान आणि ऊस पीकाचे पैसे दिले नाही, तर आंदोलन केले जाईल. मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या नावे निवेदन दिले. यावेळी सतबीर, सतीश, रोहताश, रामफल, कृपाराम आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here