धामपूर साखर कारखाना शेतकऱ्यांना विकणार कृषी उपकरणे

मेरठ : या वर्षी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी खतौली आणि शामलीमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. धामपूर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना कारखान्यातून कृषी उपकरणे खरेदी करण्याची व्यवस्था केली आहे. घाऊक दरात शेतकऱ्यांना कृषी औजारे मिळतील. साखर कारखान्यात पहिल्यांदाच अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

धामपूर साखर कारखान्याचे ऊस विभागाचे सरव्यवस्थापक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, विभागात खतौली आणि शामली येथील कृषी उपकरणे प्रसिद्ध आहेत. येथे तयार होणारी हैरो, टीलर, कल्टीव्हेटर, रोटावेटर, ऊस तोडणी मशीन, फावडा, ट्रक्टरसह कल्टीव्हेटर आदी यंत्रसामुग्रीचा समावेश आहे.

राज्यात मिरपूर येथील कृषी औजारे प्रसिद्ध आहेत. ऊस तोडण्याचे कोयते चांगल्या लोखंडाचे बनवलेले आहेत. जर शेतकरी कृषी विभागाकडून यंत्रे खरेदी करतो, तर त्याने साखर कारखान्याकडून घ्यावेत. अनुदानावरच ही औजारे मिळतील. शेतकऱ्यांना यासाठी बील यंत्र खरेदी करताना जोडावे लागणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here