धाराशिव : भैरवनाथ शुगर सहा लाख मे. टन ऊस गाळप करणार – प्रा. शिवाजी सावंत

धाराशिव : परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. युनिट क्रमांक १ या साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात पार पडला. कारखान्याने चालू गळीत हंगामात सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याकडे परिसरातील १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाची नोंद झाली असून चालू गळीत हंगामात ऊस उत्पादकांना योग्य दर दिला जाईल, अशी ग्वाही प्रा. शिवाजी सावंत यांनी दिली. बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन समारंभात ते बोलत होते.

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शिवाजी सावंत, कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत, व्हाइस चेअरमन विक्रम सावंत, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत आणि अविनाश वाडेकर यांच्या हस्ते सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब हाडोंग्रीकर, रामचंद्र घोगरे, नगराध्यक्ष जाकीर सौदागर, नवनाथ जगताप, आण्णासाहेब जाधव, राहुल डोके, संजयकुमार बनसोडे उपस्थित होते. सुभाष भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here