धाराशिव : कळंब तालुक्यातील चोराखळीच्या धाराशिव साखर कारखान्याचा २०२६-२७ चा पंधरावा बॉयलर अग्निप्रदीपन व गाळप हंगामाचा शनिवारी (ता. १७) महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. गाळप हंगाम २०२६-२७यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वांना कारखान्याचे चेअरमन तथा माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या गाळप हंगामामध्ये कारखाना व्यवस्थितरीत्या चालवून जास्तीत-जास्त गाळप करण्याबाबत जनरल मॅनेजर ए. एस. पठाण यांनी व्यवस्थापनास आश्वासन दिले.
बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाला कारखान्याचे संचालक रणजित भोसले, संतोष कांबळे, विलास काळे, संदीप खारे, संजय खरात, सुरेश सावंत तसेच डीव्हीपी बँकेचे चेअरमन सूरज पाटील, प्रा. सुनील पाटील, दहिफळचे माजी सरपंच चरणेश्वर पाटील, अक्षय पाटील तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर ए.एस. पठाण सर्व खातेप्रमुख, विभाग अधिकारी, कर्मचारी व कामगार, तसेच कारखाना परिसरातील शेतकरी सभासद, तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















