धाराशिव : श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रिज लिमिटेड कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

धाराशिव : खासमवाडी (ता. कळंब) येथील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रिज लिमिटेड या कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा शनिवारी (ता. १९) विधिवत धार्मिक वातावरणात पार पडला. श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांच्या आई मीना कुलकर्णी यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. २०२६-२७ च्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगली सेवा देतानाच कारखान्याचे कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे दत्ता कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याच्या वाटचालीतील केंद्रबिंदू असून, शेतकऱ्यांचा विश्वास, कामगारांचे परिश्रम आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान यांच्या बळावर आगामी हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गळीत हंगामासाठी कारखान्याची तयारी, यंत्रसामग्रीची सज्जता, तांत्रिक व्यवस्था आणि विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. हंगाम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, प्रतीक देवळे, मंगेश कुलकर्णी, प्रथमेश आवटे, अभयसिंह शिंदे, बालाजी जमाले, विकास उबाळे तसेच कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here