धाराशिव : सिद्धिविनायक समुहाच्या दोन साखर कारखान्यांत मिल रोलर पूजन, गाळपासाठी सज्जता

धाराशिव : सिद्धिविनायक समुहाच्या युनिट क्रमांक एक – श्री सिद्धिविनायक अॅग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, देवकुरुळी आणि श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, खामसवाडी या युनिट क्रमांक दोनमध्ये आगामी २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम पार पडला. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर याचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण सेवांच्या जोरावर आगामी ऊस गळीत हंगाम यशस्वी करण्याचा ठाम निर्धार सिद्धिविनायक परिवाराने व्यक्त केला.

सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांच्या आई मीना यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी दीपाली कुलकर्णी, बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी, प्रतीक देवळे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, मंगेश कुलकर्णी, प्रथमेश आवटे, विकास उबाळे यांच्यासह कारखान्यातील सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतूकदार आणि शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here