धाराशिव : भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी ‘प्रहार’चा उपोषणाचा इशारा

धाराशिव : उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल तात्काळ अदा करावे, अन्यथा कारखान्यासमोर दि.८ जुलैपासून आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती संघटना लोहारा व औसा तालुक्याच्या वतीने उमरगा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्यास २०२५-२६ च्या गळीत हंगामात लोहारा, उमरगा, औसा व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा करून सहकार्य केले. मात्र, हंगाम संपूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप ऊस बिलाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या खरीप हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी, बियाणे, खते यासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे तात्काळ ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत संबंधित कारखाना प्रशासनास आदेशीत करावे अन्यथा दि. ८ जुलैपासून भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रहार संघटनेचे लोहारा तालुकाध्यक्ष वामन डावरे, औसा तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ आनंदगावकर, आबा भुरे, प्रकाश सुर्यवंशी, माऊली शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here