धाराशीव : कळंब तालुक्यात १३ हजार हेक्टर क्षेत्रात उसावर चाबूक काणी रोगाचा फैलाव

धाराशीव : कळंब तालुक्यात हवामानातील बदलामुळे ऊसांवर चाबूक काणी रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे. खोडव्यामध्ये या रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यात मागील काही वर्षांत उसाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊन प्रादुर्भाव २० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. सुमारे १३ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र झाले आहे. सध्या ‘चाबूक काणी’ रोगाचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सुरुवातीला ८००५ व ०२६५ या जातींवर या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत होते. आता ८६०३२ या जातीवरही या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कळंब तालुक्यात उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. यावर्षी ऊस पिकावर चाबूक काणी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाकडे वळण्यास सुरुवात केली आहे. मात्र सध्या ऊस पिकावर चाबूक काणी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

काणी रोगामुळे उसाचे उत्पादन आणि साखर उताऱ्यावर विपरीत परिणाम होतो. काणी रोगामुळे लागवड व खोडवा ऊस पिकाचे उत्पादन २९ ते ७० टक्क्यांपर्यंत घटू शकते. खोडवा पिकाचा सुरुवातीचा काळ उन्हाळ्यात येत असल्याने हवेतील व जमिनीतील तापमान वाढते आणि रोगास पोषक वातावरण तयार होते. शेतकऱ्यांनीही पिकांची नियमित पाहणी करून रोगग्रस्त उसाचे तुकडे वेगळे करून नष्ट करावेत, तसेच योग्य वेळी औषध फवारणी करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. स्थानिक कृषी कार्यालयानेही या संदर्भात मार्गदर्शन शिबिरे घेण्याची तयारी सुरू केली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here