धुळे : येथे आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या ऊस परिषदेत एकरी १०० टनांहून अधिक उत्पादन घेणान्या १३ शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. किरणभाऊ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, ऊस उत्पादक शेतकरी व मान्यवर उपस्थित होते. ऊस विकासाचे कार्य करणान्या नऊ ऊस मार्गदर्शकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कृषीभूषण डॉ. संजीवदादा माने यांनी “एकरी शंभर टन ऊस उत्पादन सहज शक्य” या विषयावर मार्गदर्शन केले. राज्य सरकारने तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ऊस विकास विभाग सक्षम करावा, असे आवाहन तज्ज्ञांच्यावतीने करण्यात आले.
परिषदेत अतुलनाना माने-पाटील यांनी साखर कारखान्यांनी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ऊस विकास विभाग सक्षम करावा, असे आवाहन केले. यंदा कमी पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून आगामी दोन गाळप हंगामात ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने आधीपासून नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. उत्तमराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. अनंतराव निकम यांनी कारखान्यांच्या कृषी विकास विभागाच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. महेंद्र घाडगे यांनी खत व्यवस्थापनाबाबत आणि सुरेश मगदूम यांनी ठिबक सिंचनाच्या महत्वाबाबत मार्गदर्शन केले.


















