शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पादन वाढीवर भर द्यावा : माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख व बब्रुवानजी काळे यांनी ४० वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचे महावृक्षात रूपांतर झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडत आहेत. शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुधारले पाहिजे. हे पाहत असताना मांजरा परिवाराने शेतकरी, त्या व्यवस्थापनाचे कर्मचारी यांचे हित जोपासण्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आगामी काळात गाळपास येणाऱ्या ऊसालाही अधिक भाव देऊ, असे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी सांगीतले.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची २०२५-२६ ची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन, सहकारमहीं दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रंसगी ते बोलत होते.सभेत देशमुख यांनी कारखान्याच्या कर्मचा-यांना १० टक्के दिवाळी बोनस जाहिर केला.

ChiniMandi WhatsApp Channel

देशमुख म्हणाले की, हार्वेस्टर चालकांनी हर्वेस्टर करिता घेतलेल्या कर्जाचे हप्ते यावर्षीच्या बरोबरच पुढच्या वर्षीचेही हप्ते बँकेला अदा केले आहेत. ही ताकद केवळ साखर कारखाने व जिल्हा बँकेमुळे निर्माण झाली आरी हे. साखर कारखाने, जिल्हा बँकेमुळे लातूर पॅटर्नचे वेगळेपण आपणाला पहायला मिळत आहे. केवळ साखर कारखाने आर्थिक व्यवस्थापनामुळे नफ्यात असले तरी लातूर जिल्ह्यातील शेतकरी सक्षम झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांची शतप्रतिशत १०० टक्के यांत्रीकीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. इथेनॉल, वीज, बायोगॅस, ऑक्सीजन, निर्मितीबरोबरच अद्यावत तंत्रज्ञानाच्या वापरातून मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्यांनी महाराष्ट्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. साखर कारखानदारीतील जवळपास सर्व पुरस्कार आणि बक्षिसे या कारखान्यांनी मिळवली आहेत. आगामी काळातही याच पद्धतीचा उत्तम कारभार करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम या परिवाराच्या माध्यमातून होत राहील, असेही त्यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here