साखर कारखान्यांकडून एफआरपी थकीत, शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यास अडथळे

पुणे : राज्यात यंदाचा २०२५-२६ चा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे. मार्चअखेर ऊसतोडणी वाहतूक खर्चासह ‘एफआरपी’ची देय रक्कम ३९ हजार ९७१ रुपये इतकी होती. मात्र, कारखान्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३६ हजार ९८० रुपये जमा केले आहेत. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे सुमारे २ हजार ९९१ कोटी रुपये थकीत ठेवले आहेत. ऊस बिलाची संपूर्ण रक्कम न दिल्यामुळे शेतकऱ्यांना विहित वेळेत पीक कर्ज भरणा करणे अशक्य झाले आहे. साखर आयुक्तालयाने सकारात्मक कार्यवाही करण्याची तसेच सवलतीचा लाभ प्राप्त होण्यासाठी बँकांनी पीक कर्ज भरणा करण्यास वाढीव मुदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी बँका, पतसंस्थांकडून घेतलेले पीक कर्ज वेळेवर परतफेड करण्याची व नियमित कर्जदार म्हणून प्रोत्साहन लाभ मिळविण्यासाठी विहित वेळेत कर्ज भरणा करणे गरजेचे आहे. खरीप हंगाम २०२५ साठी शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची रक्कम ३६५ दिवसांत जमा करणे गरजेचे आहे. याबाबत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत ‘एफआरपी’ची रक्कम मिळावी, यासाठी साखरेची एमएसपी, उसाची एफआरपी व इथेनॉल व उपपदार्थ निर्मिती व विक्री यासंबंधी सुधारित सुसंगत धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीचे नियोजन करण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here