गोवा : संजीवनी साखर कारखाना पुढील वर्षी सुरू करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

पणजी : राज्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर बुधवारी शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या ८४ व्या वार्षिक अधिवेशनाचे आणि आंतरराष्ट्रीय शुगर एक्स्पो २०२६ चे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ह घोषणा केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी साखर उत्पादकांशी संवाद साधताना सांगितले की, संजीवनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सरकार गांभीयनि प्रयत्न करीत आहे. देशात पेट्रोलमध्ये ई-२० मिश्रणाचा वापर वाढत असल्याने इथेनॉल निर्मितीला मोठी संधी निर्माण झाली आहे. साखर उत्पादकांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल निर्मितीकडेही लक्ष द्यावे. ऊस उत्पादकांनी ‘ऊर्जादाता’ होण्याची गरज आहे. संजीवनी साखर कारखान्याबाबत पुढील वर्षी ऊस उत्पादकांना ‘गोड बातमी’ मिळू शकते. शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढविण्यासोबतच जलसंधारण, आधुनिक साखर निर्मिती तंत्रज्ञान, इथेनॉल उत्पादन आणि जैवऊर्जेच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here