शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : एफआरपीमध्ये शंभर रुपयांची वाढ, आगामी हंगामात प्रतिटन ३६५० रुपये मिळणार

कोल्हापूर: केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.आगामी २०२६-२७ गाळप हंगामासाठी एफआरपीत प्रतिटन १०० रुपयांची वाढ केली आहे. २०२५-२६ हंगामासाठी एफआरपी ३५५० होती. ती आता ३६५० रुपये इतकी केली आहे. १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी ही रक्कम उत्पादकांना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने हा निर्णय घेतला आहे. कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार हा दर निश्चित करण्यात आला आहे.

एक ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या नवीन हंगामात सर्व साखर कारखान्यांना हा नवा दर लागू करणे बंधनकारक आहे. पुढील हंगामासाठी उसाचा सरासरी उत्पादन खर्च १८२० रुपये प्रतिटन इतका गृहित धरला आहे. जाहीर ३६५० रुपयांची एफआरपी उत्पादन खर्चाच्या तुलनेत १००.५ टक्के अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, असे केंद्राने म्हटले आहे. सध्याच्या २०२५-२६ साखर हंगामाच्या तुलनेत ही वाढ २.८१ टक्क्यांनी अधिक आहे. याचा देशातील पाच कोटी ऊस उत्पादकांना फायदा होईल, असे सांगण्यात आले. ज्या साखर कारखान्यांची रिकव्हरी ९.५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रतिटन ३३८० रुपये हमखास मिळणार आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here