साखर कारखाना विकला तरी उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर देणे अशक्य : डॉ. प्रभाकर कोरे

बेळगाव (कर्नाटक) : साखर उद्योगासमोरील सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता उसाला प्रतिटन ५ हजार ५०० रुपये दर देणे कोणत्याही साखर कारखान्याला शक्य नाही. कारखाना विकला तरी एवढा दर देणे शक्य होणार नाही, असे स्पष्ट मत माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले. नणदी येथील चिदानंद कोरे साखर कारखान्यात पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. कोरे यांनी साखर उद्योगासमोरील आर्थिक अडचणींचा आढावा घेतला. ते म्हणाले की, गेल्या १५ वर्षांत साखरेच्या बाजारभावात अपेक्षित वाढ झालेली नाही. मात्र, कच्चा माल, उत्पादन आणि अन्य खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तयार साखर आणि कच्च्या मालाच्या किमतीत मोठी तफावत निर्माण झाली आहे.

वीजबिलाच्या थकबाकीचाही फटका

ChiniMandi WhatsApp Channel

साखर कारखान्यांकडून शासनाला प्रतियुनिट तीन रुपयांप्रमाणे वीजपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या विजेचे पैसे शासनाकडून वेळेवर मिळालेले नाहीत. त्यामुळे कारखान्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत. या अडचणींच्या परिस्थितीतही कारखाने शेतकऱ्यांना वेळोवेळी उसाचे पैसे देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले.

साखर विक्रीवरील निर्बंधांचा परिणाम

यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचे मान्य करताना डॉ. कोरे म्हणाले की, उसाची उपलब्धता, साखरेच्या विक्रीवर असलेले शासनाचे निर्बंध आणि वाढता उत्पादन खर्च याचा साखर उद्योगावर मोठा परिणाम होत आहे. साखरेची विक्री आणि बाजारपेठेतील परिस्थितीही कारखान्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. केवळ १५ दिवसांत एक लाख पोती साखर विक्री करणेही कारखान्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे साखर उद्योगातील आर्थिक गणित आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षित दरामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याचे डॉ. कोरे यांनी स्पष्ट केले.

Bioenergy Times

1 COMMENT

  1. कारखान्याची सत्ता सोडून दे कसा भाव द्यायचा ते आम्ही बघून घेऊ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here