जालना : बागेश्वरी साखर कारखाना प्रतिटन ३१०० रुपये ऊस दर देणार – चेअरमन शिवाजीराव जाधव

जालना : माँ बागेश्वरी साखर कारखान्याच्यावतीने मागील हंगामातील तिसरा हप्ता २०० रुपयाप्रमाणे येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, तर यावर्षी उसाचा प्रति मे. टन दर हा ३१०० रुपये देण्यात येणार आहे पहिला हप्ता २७०० रुपये प्रमाणे देण्यात येईल. दुसरा हप्ता २०० रुपये खरिपाच्या पेरणीवेळी तर तिसरा हप्ता २०० रुपयांप्रमाणे पुढील हंगामाच्या सुरवातीला देण्यात येणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे चेअमरन शिवाजीराव जाधव यांनी केली. बॉयलर प्रदीपन करून व गव्हाणीमध्ये मोळी टाकून हंगामाचा प्रारंभ करताना ते बोलत होते. कारखाना फेब्रुवारी अखेरपर्यंत बिगर नोंदीसह सर्व ऊस उचलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

चेअरमन शिवाजीराव जाधव म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कारखान्याचा गळीत हंगाम लवकर सुरू केला आहे. यंदा प्रति मेट्रिक टन ३१०० रुपये ऊसदर देण्याचे जाहीर केले असून, फेब्रुवारीअखेरपर्यंत सर्व ऊस गाळपासाठी आणण्याचे आमचे नियोजन आहे. यावेळी राजेंद्र तौर, संतोष दिंडे, जनरल मॅनेजर आर. आर. निर्वळ, वर्क्स मॅनेजर सोपान मोरे, मुख्य शेतकी अधिकारी पी.टी. खंदारे, चीफ केमिस्ट मधुकर कच्छवे, डिस्लरी मॅनेजर सचिन आव्हाड, चीफ इंजिनिअर गजानन जाधव, वाहन मॅनेजर सुंदराव देशमुख, डेप्युटी इंजिनिअर निखिल बोराटे, डेप्युटी चीफ केमिस्ट कैलास नेमाने, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर संजय सिंग, विठ्ठलराव बागल आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here