जालना : समृद्धी साखर कारखान्यातर्फे आगामी गाळप हंगामाची तयारी; रोलर मिल पूजन उत्साहात

जालना : आगामी २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी समृद्धी साखर कारखाना सज्ज होत असून, रविवारी (ता. पाच) कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात रोलर पूजन विधिवत पार पडले. आगामी गळीत हंगाम सुरळीत, सुरक्षित व यशस्वीपणे पार पडावा, यंत्रसामग्री अखंडित कार्यरत राहावी, गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे तसेच शेतकरी, कामगार आणि कारखान्याची सातत्याने प्रगती व्हावी, या भावनेतून दरवर्षी रोलर पूजनाची परंपरा जपली जाते. यंदाच्या गाळप हंगामासाठी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिलीप मामा फलके यांच्या हस्ते विधिवत रोलर पूजन करण्यात आले.

शिंदे, फॅक्टरी मॅनेजर रूपराव माथनकर, शेतकी अधिकारी अमोल तौर, अकौंट मॅनेजर सुनील देसाई, एक्झिक्युटिव्ह परचेस अधिकारी प्रदीप घाटगे, कमर्शियल मॅनेजर प्रमोद गोसावी, चिफ केमिस्ट सुमीत कुमार माथुर, चिफ इंजिनिअर सतीश सुरवसे, सिव्हिल इंजिनिअर किशोर पवार, ऊस पुरवठा अधिकारी विजय देशमुख, ऊस पुरवठा अधिकारी भास्कर तनपुरे, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर राहुल राऊत, शुगर अकौंटंट विजय पंडित, हेड टाईम किपर विकास खरात तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here