कर्नाटक : कोरे साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू, १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

बेळगाव : चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ या गळीत हंगामाचा प्रारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात झाला. बॉयलर प्रज्वलन, केन कॅरिअरचे पूजन आणि ऊस गाळपाचा प्रारंभ करून ते बोलत होते. निडसोशी मठाचे निजलिंगेश्वर स्वामी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. बॉयलर पूजनाचा विधी मल्लाप्पा मैशाळे दाम्पत्याच्या हस्ते झाला. चालू गळीत हंगामात कारखान्याने १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकरी सभासदांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी यावेळी केले.

अध्यक्ष कोरे म्हणाले की, संचालक मंडळाच्या योग्य निर्णयांमुळे कारखान्याची वाटचाल अधिक सक्षमपणे सुरू आहे. केएलई संस्थेचे मानद कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे कार्याध्यक्ष अमित कोरे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सातत्याने प्रगती करीत आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक महांतेश कवटगीमठ, अजित देसाई, भरतेश बनवणे, परसगौडा पाटील, संदीप पाटील, महावीर मिर्जी, मल्लाप्पा मैशाळे, चेतन पाटील, भीमगौडा पाटील, महावीर कात्राळे, अण्णासाहेब इंगळे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर. बी. खांडगावे यांच्यासह शेतकरी सभासद, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here