कर्नाटक : ‌अथणी शुगर्समध्ये स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : केंपवाड येथील अथणी शुगर्स आवारात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अथणी शुगर्स लिमिटेडच्या सुरक्षा विभागातील जवान तसेच केंपवाड न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह कारखान्याच्या कॉन्व्हेंट स्कूलमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

यावेळी संस्थापक, अध्यक्ष श्रीमंत पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून देशाच्या विकासात प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात केंपवाड व शिनाळ येथील शाळांमध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन देऊन प्रोत्साहन देण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी व मान्यवर, कारखान्याच्या विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कारखान्यातील कामगार उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here