कर्नाटक : हालसिद्धनाथ कारखान्याच्या ऊस विकास योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या दूरदृष्टीमुळे ऊस विकास योजना चालू आहे. या अंतर्गत एकसंबा येथे प्रगतशील शेतकरी गणपती शिंदे यांच्या शेतात प्रात्यक्षिक प्लॉटला अधिकाऱयांनी भेट दिली. ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील यांनी प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कारखान्याचे एसीडीओ संजय खोत, शरद बनणे, शिवानंद रेंदाळे, शरद शिंदे, अजित वाळके आदी उपस्थित होते.

ऊस विकास योजनेअंतर्गत हा ‘एम. एस.१०००१’ ऊस जातीचा प्लॉट तयार करण्यात आला आहे. या प्लॉटमधील उसाची वाढ, फुटव्यांची संख्या, पीक, खत व पाणी व्यवस्थापन, रोग व किडीचे नियंत्रण तसेच अधिक उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत ऊस विकास अधिकारी विश्वजीत पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘एम. एस. १०००१’ ही जात अधिक उत्पादनक्षम असून योग्य व्यवस्थापन केल्यास उत्कृष्ट उत्पादन मिळू शकते. वेळेवर तण नियंत्रण, सिंचन आणि रोग-किडींचे व्यवस्थापन करा. सिलिकॉन, सेंद्रिय खते आणि जैविक घटकांचा वापर केल्यास उसाची वाढ व उत्पादन सुधारते, असे त्यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here