कर्नाटक : हालसिद्धनाथ कारखान्याकडे दोन कोटी ६९ लाख जमा, शेतकऱ्यांना मिळणार प्रति टन ५० रुपये अनुदान

बेळगाव : येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याकडून गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये पुरवठा झालेल्या ५ लाख ३८ हजार ६२ मेट्रिक टन उसापोटी २ कोटी ६९ लाख ३ हजार ४४५ रुपये एवढी रक्कम आज शुक्रवारी, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरगावे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. राज्य शासनाने यंदाच्या गळीत हंगामात प्रती टन ५० रुपय अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याचे पैसे जमा झाले आहेत. कारखान्याने यंदा उसाला प्रतिटन ३ हजार ३६० रुपये दर दिला आहे. दुसऱ्या हप्त्यापोटी शासन ५० व कारखान्याचा वाटा ५० रुपये अशी विभागणी असून कारखान्याच्या वाट्याची ५० रुपयांची रक्कम याआधीच शेतकऱ्यांना अदा केली आहे.

याबाबत माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरगावे म्हणाले की,कारखान्याने यंदाच्या हंगामात एकूण ५ लाख ७७ हजार ६७२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. त्यापैकी ५ लाख ३८ हजार ६२ मेट्रिक टन ऊस कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांकडून, तर ३९ हजार ६१० मेट्रिक टन ऊस महाराष्ट्र हद्दीतील शेतकऱ्यांनी पुरवला होता. कर्नाटकातील शेतकऱ्यांना शासनाकडून आलेली, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १९ लाख ८० हजार ५२२ रुपये अनुदानाची रक्कम स्वतः कारखाना अदा करणार आहे. कारखान्याचे मार्गदर्शक व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा गळीत हंगाम यशस्वी झाला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here