कर्नाटक : कर्जमाफीसह उसाच्या एफआरपीसाठी कर्नाटक राज्य रयत संघाचे आंदोलन

बेळगाव : कर्नाटक राज्य रयत संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे सोमवारी (ता. २८) शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी आणि उसाला योग्य आधारभूत दर जाहीर करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना गंभीर दुष्काळाच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने प्रत्येकी ५० टक्के वाटा उचलून शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करावे, तसेच बँकांनी कर्जवसुली थांबवावी, अशी मागणी संघटनेने केली. सरकारने कृषी क्षेत्राला प्राधान्य देऊन कृषी पंपांसाठी किमान सात तास वीजपुरवठा करावा अशी आग्रही मागणीही शेतकऱ्यांनी केली. या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

बेळगाव तालुकाही दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि पिकांच्या नुकसानीची शास्त्रीय पद्धतीने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी संघटनेने केली. रयत संघाच्या कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे शिरस्तेदार एम. एम. नदाफ यांना निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष बसवराज मोकाशी, तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा सचिव कुमार नावी, खानापूर तालुका अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, तालुका उपाध्यक्ष वैजू लुम्याचे, अमृत मुद्दन्नावर, प्रकाश चलवेटकर, प्रकाश लोहार आदी उपस्थित होते. राज्य सरकारने शेतीचा पुरवठा पुर्ववत ठेवावा अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here