कर्नाटक : उसाला प्रतिटन ४,५०० रुपये एफआरपी देण्याची ऊस उत्पादक संघटनेची केंद्र सरकारकडे मागणी

बंगळूर : वाढता उत्पादन खर्च, अपुरा मोबदला, दुष्काळ, पीक नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे ऊस उत्पादक आर्थिक संकटात आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचे होणारे आर्थिक शोषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्य ऊस उत्पादक संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे. यंदा उसाला प्रतिटन किमान ४,५०० रुपये रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) निश्चित करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भात नीती आयोगाचे माजी सदस्य रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या केंद्राच्या समितीला संघटनेचे अध्यक्ष कुरुबूर शांतकुमार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.

केंद्र सरकारने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारने १४ ऑक्टोबरला चार सदस्यीय समिती स्थापन केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न, साखरेचे दर, वजनपद्धती आणि यंत्राद्वारे तोडलेल्या उसाच्या दरातील कपात या मुद्द्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी समितीवर आहे. या समितीला दिलेल्या निवेदनात राज्याच्या ऊस विकास आयुक्तांच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी एक टन ऊस उत्पादनासाठी ४,४५० रुपये खर्च येत होता. त्यामुळे १०.२५ टक्के साखर उताऱ्याच्या आधारावर प्रतिटन ४,५०० रुपये एफआरपी निश्चित करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. व्यावसायिक वापराच्या साखरेला स्वतंत्र आणि जादा दर निश्चित करावा. घरगुती वापराच्या साखरेचे सध्याचे दर कायम ठेवून व्यावसायिक विक्रीतून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्यांना द्यावे, असा प्रस्तावही मांडला आहे. ऊस पुरवल्यानंतर १४ दिवसांत पैसे द्यावेत आणि विलंब झाल्यास व्याज आकारावे, असेही संघटनेने म्हटले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here