कवठेएकंदला मध्यरात्री फडाला आग, उसासह ट्रॉलीही जळाली

सांगली : बुधवारी मध्यरात्री, एकच्या सुमारास लागलेल्या आगीत कवठेएकंद (ता. तासगाव ) येथे अभिजित बाबासो शिरोटे (वय ३०) यांचा ऊस जळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीत ऊस भरलेली ट्रॉलीही जळाली. याबाबत अभिजित शिरोटे यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. मध्यरात्री अचानक या उसाच्या फडाला नेमकी कशामुळे आग लागली हे समजू शकले नाही.

गट नंबर ७२४ मधील शेत जमिनीत अभिजित शिरोटे यांची चार एकर शेती आहे. त्यात सध्या ऊस तोड सुरू आहे. मध्यरात्री या उसाला आग लागल्याची माहिती दीपक भिलवडे यांनी दिली. यावेळी अभिजित आणि त्यांच्या भावांनी जाऊन पाहणी केली असता ऊस जळाला होता. दरम्यान ऊस तोडून एका ट्रॉलीतही भरून ठेवला होता. या ट्रॉलीला आग लागून मोठे नुकसान झाले. दरम्यान, आगीची माहिती समजतात तलाठ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here