कोल्हापूर : ‘अन्नपूर्णा शुगर’ अडीच लाख टन ऊस गाळप करणार, बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात

कोल्हापूर : कागल तालुक्यातील अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्समध्ये ७ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात झाला. यावेळी श्री सत्यनारायण पूजा, होम हवन, संचालक तानाजी पाटील, जयश्री पाटील यांच्या हस्ते व बॉयलर अग्निप्रदीपन ‘गोकुळ’चे संचालक अंबरिष घाटगे, सुयशा घाटगे उभयतांच्या हस्ते झाले. यावेळी अरुंधती घाटगे प्रमुख उपस्थित होत्या. कारखान्याने चांगल्या प्रतिचा ऊस गाळपासाठी आणण्यासाठी शेती विभागाने तोडणी वाहतूक यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता यंदाचा हंगाम चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास मला वाटतो. यंदा २ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे संस्थापक संजय घाटगे यांनी जाहीर केले.

यावेळी संचालक अंबरिश घााटगे म्हणाले की, यंदाचा गाळप हंगाम १४० ते १४५ दिवस चालवण्याचे नियोजन असून, प्रतिदिन २ हजार मेट्रिक टन गाळपाचा मानस आहे. १८ सप्टेंबर रोजी मोळी पूजन करून प्रत्यक्ष गळीत हंगामाला सुरुवात होईल. चालू गळीत हंगाम कारखान्यातील मेंटेनन्सची सर्व कामे वेळेत पूर्ण झाली आहेत. जॅगरी पावडर व साखरेचे दरही यंदा तेजीत आहेत. त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. या कार्यक्रमास संचालक दिनकर पाटील, ए. वाय. पाटील, यशवंत माने, वीरेन घाटगे, राजू भराडे, रणजित मुडूकशिवाले, नानासो कांबळे, मनीषा पाटील, सुनीता माळी, दत्तात्रय दंडवते, सातापा तांबेकर, विश्वास दिंडोर्ले, शामराव बल्लाळ, शामराव चौगले, सुनील कोकितकर, सुनील देसाई, प्रशांत खामकर, डी. एस. पाटील, अक्षय पाटील, सागर सरदेसाई, कृष्णात कदम, अशोक पाटील, आकाराम बचाटे, प्रकाश मगदूम, अण्णासो डाफळे, दत्तोपंत वालावकर, बाळासो निंबाळकर आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here