कोल्हापूर : अथर्व-दौलत कारखान्याकडून प्रती टन ३४०० रुपये दराने १०० टक्के ऊस बिले अदा

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व-दौलत साखर कारखान्याची एफआरपी थकीत नाही. केवळ नजरचुकीने थकीत एफआरपी असलेल्या यादीत कारखान्याच्या नावाचा समावेश झाला आहे. यंदा कारखान्याने एकूण ४ लाख ४८ हजार २७१ मेट्रिक टन ऊस गाळप करून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. एकूण २७ कोटी ६५ लाख ४२ हजार ५८७ इतकी रक्कम २३ मार्च २०२६ रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहेत, अशी माहिती कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी दिली.

मराठे यांनी सांगितले की, हंगाम अखेरीस १ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत गाळप झालेल्या ८१,३३६.०५५ मेट्रिक टन उसाचे बिल रुपये ३४०० प्रतिटनप्रमाणे देय होते. त्यानुसार कारखान्याने १०० टक्के ऊस बिले अदा केली आहेत. अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. संचलित दौलत साखर कारखान्याने यंदाचा गळीत हंगाम २४ फेब्रुवारीपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाला. कारखान्याने गेल्या सात हंगामापासून जपलेली ऊस बिलांची देयके वेळेवर अदा करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवत शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here