कोल्हापूर : डी. वाय. पाटील कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन; पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सभासद, शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी केले. असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या बॉयलर अग्निप्रदीपनप्रसंगी ते बोलत होते.

उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, रवींद्र पाटील, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, उदय देसाई, पांडुरंग पडवळ, रामा जाधव, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील, एस. एम. यादव आदी उपस्थित होते. सेक्रेटरी नंदू पाटील यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here