कोल्हापूर : तांबाळे-अंतुर्ली येथील अथणी शुगर्स लि. भुदरगड युनिटचा ११ वा गळीत बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात पार पडला. व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते बॉयलरचे विधिवत पूजन करून अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील म्हणाले, गेली १० वर्षे शेतकरी बांधवांनी अथणी शुगर्सवर जो विश्वास दाखवला आहे, तेच आमचे खरे भांडवल आहे.
पाटील म्हणाले, ११ व्या हंगामात आम्ही उसाचे वेळेवर गाळप, तसेच शेतकऱ्यांना बिले वाहतूक व्यवस्थेत अधिक सुसूत्रता आणणार आहोत. या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यासाठी कारखान्याचे चीफ इंजिनिअर नामदेव भोसले, चिफ केमिस्ट प्रकाश हेदुरे, चीफ अकाऊंटंट जमीर मकानदार, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार तसेच पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते. शेती अधिकारी राजाराम आमते यांनी प्रास्ताविक केले. बाबासाहेब देसाई यांनी आभार मानले.


















