कोल्हापूर : ‘आंदोलन अंकुश’च्या पाठपुराव्यामुळे ४२६ शेतकऱ्यांना प्रतिटन १०५ रुपये जादा दर

कोल्हापूर : गेल्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी दत्त साखर कारखान्याला ‘खुद्द तोड-खुद्द वाहतूक’ करून मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला दिला होता; मात्र कारखान्याकडून ढोबळ एफआरपीप्रमाणे उर्वरित १०५ रुपये देण्यात आले नव्हते. ही बाब शेतकऱ्यांनी ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील साखर सहसंचालकांकडे अपील दाखल केले. सहसंचालक कार्यालयात सुनावणी झाली. कारखान्याने जादा रक्कम दिल्याचा अहवाल सादर केला होता; मात्र ढोबळ एफआरपीतील फरक निदर्शनास आणून दिल्यानंतर सहसंचालकांनी ७मे २०२६ रोजी शेतकऱ्यांना फरकाची रक्कम देण्याचे लेखी आदेश दिले. त्या आदेशानुसार सुमारे ४०० शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन १०५ रुपये जमा करण्यात आले आहेत.

आंदोलन अंकुश संघटनेचे नेते चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, भूषण गंगावणे, धनाजी माने, गोपाळ चव्हाण, प्रकाश बावडेकर, बंडू होगले, प्रताप चव्हाण, सारंग परीट आदी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, दत्त कारखान्याची ढोबळ एफआरपी प्रतिटन ४२५५ रुपये असताना ३४५० रुपये ऊस बिल आणि तोडणी – वाहतूक खर्च म्हणून ७०० रुपये असे ४१५० रुपये प्रतिटन देण्यात आले होते. मात्र, ‘आंदोलन अंकुश’च्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन १०५ रुपये अतिरिक्त मिळाले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here