कोल्हापूर : ‘अन्नपूर्णा शुगर’च्या शेतकऱ्यांनी केडीसीसी बँकेकडे भरला १३ लाखांचा दंड

कोल्हापूर : माजी आमदार संजय घाटगे यांच्या ‘अन्नपूर्णा शुगर’ला केलेल्या अर्थपुरवठ्याबद्दल रिझर्व्ह बँकेने केडीसीसी बँकेला केलेला १३ लाख ३० हजारांचा दंड ‘अन्नपूर्णा’च्या सभासद शेतकऱ्यांनी भरला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांनी या रक्कमेचा धनादेश देण्यात आला. यावेळी ‘गोकुळ’चे माजी संचालक अंबरीश घाटगे, के. के. पाटील, रणजित मुडूकशिवाले, ज्ञानदेव पाटील, बापूसो पाटील, ए. वाय. पाटील, एम. बी. पाटील, दिनकर दौलू पाटील, जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दंडवते, विश्वासराव दिंडोर्ले, विलास पाटील, मल्हारी पाटील, तानाजी पाटील, राजू भराडे, दिलीप चौगले, प्रदीप पाटील उपस्थित होते.

कागल तालुक्यातील अन्नपूर्णा फॅक्टरीला केडीसीसी बँकेने काही वर्षांपूर्वी कर्ज दिले होते. त्यानंतर जवळपास सव्वापाच वर्षांनी कारखान्याचे अध्यक्ष संजय घाटगे हे बँकेचे संचालक झाले. या तांत्रिक चुकीपोटी भारतीय रिझर्व्ह बँकेेने बँकेला १३ लाख रुपयांचा दंड केला होता. मात्र, याची माहिती मिळताच रविवारी घाटगे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेला केलेला दंड शेतकरी भरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी त्यांनी बँकेकडे पैसे जमा केले. यावेळी, पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. याबाबत माजी आमदार संजय घाटगे म्हणाले की, जिल्हा बँकेने पारदर्शक कारभाराच्या बळावर हजार कोटींच्या ठेवी गोळा केल्या आहेत. ‘अन्नपूर्णा’ कारखान्यामुळे बँकेला दंड होऊ नये, या भावनेतून कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी दंडाची रक्कम वर्गणी काढून दिली आहे. तर बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी कारखान्याला कर्जपुरवठा केल्यानंतर सव्वापाच वर्षांनी संजय घाटगे यांची तज्ज्ञ संचालकपदी निवड झाली. यामध्ये घाटगे व कारखान्याची कोणतीही चूक नाही. फक्त ही तांत्रिक चूक राहून गेली होती, असे स्पष्ट केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here