कोल्हापूर : शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दानोळी येथे महादेव मंदिर हॉलमध्ये दानोळी व कवठेयार परिसरातील शेतकयांचा मेळावा झाला. यावेळी डॉ. शांतीकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. दत्त कारखान्याच्या वतीने मेळाव्यांतून शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीची माहिती आणि तंत्रज्ञान देण्याचे काम कौतुकास्पद आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ऊस देशातील एकमेव शाश्वत आणि व्यावसायिक शेतीचे पीक आहे. ऊस आळशी शेतकऱ्यांचे पीक झाले आहे हा समज खोडून काढून नुकसानीत न जाता आपल्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. दानोळी येथील या शेतकरी मेळाव्यात डॉ. रवी वाघमारे व बळवंत कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. महालिंग पाटील यांनी स्वागत केले. ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी पी एस देसाई महादेवगन धनवडे, गुलाब पाटील, सुभाष पाटील, केशव राऊत, मानाजीराव भोसले, बापूसाहेब चौगुले, शंकर लंबे, आदी उपस्थित होते. सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले.


















