कोल्हापूर : ओलम साखर कारखान्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला

कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर ऊस शेतीत केल्यास हवामान, जमिनीची स्थिती, पिकाची वाढ, पाणी व खतांची गरज याबाबत अचूक माहिती मिळू शकते. कीड किंवा रोग दिसला की लगेच औषध फवारणे हा उपाय नसून, प्रथम रोग-किडीची अचूक ओळख करून त्याच्या प्रादुर्भावाची तीव्रता तपासल्यास शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, असा सल्ला ओलम साखर कारखान्यातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात विविध कृषी तज्ज्ञांनी दिला.

ओलम (हेमरस) कारखाना, यूपीएल व नेटाफिम यांच्यातर्फे कोवाड येथे मेळावा झाला. कारखान्याचे युनिट हेड एस. राधाकृष्णन अध्यक्षस्थानी होते. बिझनेस हेड टी. कन्नन, शेती अधिकारी सुधीर पाटील, अरुण देशमुख, अमोल आंधळे, डॉ. नीलेश मालेकर, विशालकुमार मिरजे उपस्थित होते. शेती तज्ज्ञ अरुण देशमुख, डॉ. नीलेश मालेकर, अमोल आंधळे यांनी मार्गदर्शन केले. नितीन पाटील, जोतिबा वांद्रे, अजित पाटील, तानाजी आडाव, शेतकऱ्यांनी चर्चेत भाग घेतला. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव पाटील यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here