कोल्हापूर : गडहिंग्लज कारखाना गेल्या हंगामातील १०० रुपयांचा हप्ता दिवाळीपूर्वी देणार

कोल्हापूर : हरळी येथील अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) ४७व्या गळीत हंगामाचा प्रारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कारखाना कार्यस्थळावर हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे होते. कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगितले. प्रकाश पताडे यांनी कारखान्याची तांत्रिक कामे पूर्ण झाली असून, नव्या हंगामासाठी सज्ज आहोत. गेल्या हंगामातील १०० रुपये दिवाळीपूर्वी देणार असल्याची घोषणा केली.

या कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, गडहिंग्लज साखर कारखाना बंद पडावा, संचालकांत भांडणे लागावीत म्हणून अनेक जण देव पाण्यात घालून बसले आहेत; परंतु जिल्हा बँकेचे सहकार्य आणि सभासदांच्या आशीर्वादामुळे कारखाना कधीही बंद पडणार नाही. संताजी घोरपडे कारखाना चालावा म्हणून मी गडहिंग्लज व आजरा कारखान्यात लक्ष घालत नाही, अशी आवई उठविली जाते. अशी ओरड करणारे म्हातारे झाले, पण आजही हे दोन्ही कारखाने सुरळीत सुरू आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

यंदा साखर कारखानदारी अडचणीत आहे. ९० दिवसही हंगाम चालत नाही. त्याचा फटका बसत आहे. साखरेचे दर वाढल्यामुळे केंद्र शासनाने अनेक बंधने आणली. ऊस उत्पादकांनी सर्व ऊस कारखान्याला घालावा. एफआरपी वेळेवर दिली जाईल. जो दर ठरेल तो गडहिंग्लज कारखान्याकडून दिला जाईल. त्यासाठी सहकार्य केले जाईल. यावेळी पंचायत समितीच्या सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे, जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, शिवशंकर हत्तरकी यांच्यासह संचालक उपस्थित होते. संचालक अक्षय पाटील यांनी आभार मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here