कोल्हापूर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यातर्फे (गोडसाखर) रामनवमी आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तोडणी-वाहतूक यंत्रणेच्या कराराचा प्रारंभ करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण व संचालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी स्वागत केले.
उपाध्यक्ष चव्हाण म्हणाले, गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये अखंडित उसाचा पुरवठा होण्यासाठी सक्षम तोडणी-वाहतूक यंत्रणेचे करार करण्याचे नियोजन केले असून, कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील तोडणी वाहतूक प्रतिनिधींनी कारखाना कार्यालयाशी संपर्क साधावा. कारखान्याने आगामी गळीत हंगामात ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, मशिनरी ओव्हर हॉलिंगची कामे वेगाने सुरू आहेत. ऊस बागायतदारांनी उसाच्या नोंदी करून कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित तोडणी वाहतूक प्रतिनिधींसोबत करार करण्यात आला. संचालक विश्वनाथ स्वामी, विद्याधर गुरवे, सतीश पाटील, शिवराज पाटील, काशीनाथ कांबळे, अक्षयकुमार पाटील, अशोक मेंडुले, बाळासाहेब देसाई, शिवशंकर हत्तरकी, भरमू जाधव, कविता पाटील, मंगल आरबोळे आदी उपस्थित होते.

















