कोल्हापूर : आजरा तालुक्यात गव्याच्या कळपाकडून ऊस पिकाचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल

कोल्हापूर: आजरा तालुक्यात गव्यांच्या कळपाने रात्री धामणे येथे ऊस पिकात धुडगूस घालून नुकसान केले. सुमारे ४० गवे पिकांत शिरले. राखणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी त्याचे व्हिडिओ चित्रण करून सोशल मीडियावर टाकून गावातील इतर शेतकऱ्यांना सावध केले. परिसरातील पिकांचे गव्यांनी नुकसान केल्याने धामणेतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गव्यांनी पुंडलिक धामणकर, सचिन राजाराम, साताप्पा भोसले, विकास लोखंडे, चंद्रकांत गिलबिले आदींच्या शेतातील पिके खाऊन नुकसान केले आहे. या परिसरात नदी व विहिरीच्या पाण्यावर ऊस, गहू, शाळू, मका अशी उन्हाळी पिके घेतली जातात. परिसरात सलग पाच वर्षे गव्यांच्या कळपांचे वास्तव्य वाढू लागले आहे. बुधवारी रात्री येथे गव्यांचा कळप दाखल झाला आहे. साखर कारखाना परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात धुडगूस घातला. गावाला लागून जंगल क्षेत्र आहे. जंगलात ओल्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागताच गवे या परिसराकडे येत आहेत. यावर वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सुनील सावंत यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here