कोल्हापूर : साखर, केमिकल मिश्रणामुळे कोल्हापुरी गूळ बदनाम, भेसळयुक्त निर्मिती थांबविण्याची गरज

कोल्हापूर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते मार्चपर्यंत ऊस हंगाम चालतो. १ एप्रिलपासून आजपर्यंत समितीत ५३ हजार गूळ रव्यांची आवक झाली आहे. कोल्हापूरमधील उसापासून तयार होणारा गूळ दर्जेदार असल्यामुळे मोठी मागणी आहे; मात्र कोल्हापुरी गुळाला गेल्या काही वर्षांपासून भेसळयुक्त गुळाचा डाग लागला आहे. येथील गुळाचा सर्वोत्तम दर्जा अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान, गुजरातमधील अन्न-औषध विभागाच्या तपासणीत गुळात सल्फरचे प्रमाण जास्त दिसून आले. यामुळे गूळ व्यापाऱ्यांवर कारवाई झाली आहे. हा गूळ कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकमधून पुरवठा झाला असल्याने सोमवारपासून येथील गूळ खरेदी बंद केली आहे. यामधून जिल्ह्यात केमिकल, साखरेपासून गूळनिर्मिती सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यातील काही गुऱ्हाळघरांमध्ये साखर, केमिकलचा वापर करून गूळ तयार केला जातो. या प्रकारामुळे कोल्हापूरच्या गुळाचा दर्जा खालावत असून तो बदनामही होत आहे. भेसळयुक्त गूळनिर्मितीकडे बाजार समिती, अन्न औषध विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे. अशा पद्धतीने तयार होणाऱ्या गूळनिर्मितीला चाप बसविणे गरजेचे आहे. कोल्हापूर बाजार समितीने शेतकऱ्यांना केवळ पत्राद्वारे गुळात कलरचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या. अन्न-औषध प्रशासनाचे या प्रकाराकडे लक्ष नाही. भेसळयुक्त गूळनिर्मितीला चाप बसविण्यासाठी समिती, अन्न-औषध प्रशासनाला जाग केव्हा येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कर्नाटकमधील उसावर काही गुऱ्हाळे सुरू आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here