कोल्हापूर : गुळाच्या एक दिवसाआड सौद्यांबाबत बाजार समितीत शनिवारी होणार निर्णय

कोल्हापूर : कोल्हापुरी गुळाला देशभरात मोठी मागणी असते, मात्र गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये रंग असलेला गूळ नाकारला जात आहे. रंगाचा अतिवापर आरोग्यास घातक ठरत असल्याच्या तक्रारींमुळे व्यापाऱ्यांकडून असा गूळ खरेदी करण्यास नाराजी व्यक्त केली जात होती. यातच एक दिवसाआड सौदे काढण्याची भूमिका आडत्यांनी घेतली आहे. त्याबाबत बाजार समितीमध्ये संबंधित घटकांची बैठक बोलावण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत या दोन वेगळ्या विषयांवरून व्यापारी व माथाडी कामगारांनी सौदे बंद केले होते. आता गुळाचे सौदे एक दिवसाआड काढण्याबाबत शनिवारी (ता. ११) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी शेतकऱ्यांनी व्यापारी व अडत्यांच्या भूमिकेबद्दल प्रवेशद्वार अडवून रोष प्रकट केला होता. त्यानंतर बाजार समितीने हालचाली केल्या. परिणामी गुरुवारी (ता. ९) येथील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे गुरुवारी (ता. ९) अपेक्षेप्रमाणे नियमित झाले. सौद्यांबाबतची अनिश्चितता तूर्त संपली आहे. बाजार समितीने गूळ उत्पादकांना गुळात रंगाचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, रंगाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे मोठे आव्हान बाजार समितीसमोर आहे. व्यापारी असोसिएशनच्या पत्राच्या अनुषंगाने गूळ उत्पादकांना रंगाचा वापर न करण्याबाबतचे पत्र बाजार समितीने दिले आहे. व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे रंगाच्या वापराबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here