कोल्हापूर : आजरा कारखान्यात मिल रोलरचे पूजन, यंदा ४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याकडे यंदा गळीत हंगामाकरीता ७,७०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या हंगामात ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे कारखान्याने उद्दिष्ट निश्चित केले आहे. परजिल्ह्यातील व स्थानिक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेस अॅडव्हान्सची रक्कम वाटप केली आहे, अशीही माहिती कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांनी दिली. अध्यक्ष देसाई यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत गुरुवारी मिल रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

सध्या साखर कारखान्यात आगामी गळीत हंगामाकरिता ओव्हर होलिंगचे काम गतीने सुरू आहे अशी माहिती देण्यात आली. मिल रोलर पूजन कार्यक्रमाला उपाध्यक्ष अनिल फडके, संचालक वसंतराव धुरे, उदय पवार, मधुकर देसाई, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, रणजित देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, रचना होलम, मनीषा देसाई, तज्ज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशीद पठाण आदींसह कारखान्याचे कामगार, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here