कोल्हापूर : ओलम शुगर्सची गळीत हंगामासाठी जय्यत तयारी, ऊसतोडणी, वाहतूक करारास प्रारंभ

कोल्हापूर : ओलम शुगर्सच्यावतीने (हेमरस) कोवाड येथील कारखान्याच्या विभागीय कार्यालयात आगामी गळीत हंगामातील ऊस तोडणी व वाहतूक कराराला प्रारंभ करण्यात आला. उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याचे शेती अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप झाले. ओलम कारखान्याने शेतकऱ्यांसाठी शेती विकास कार्यक्रमांतर्गत विविध शेती विकास योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

शेतकरी व ऊस उत्पादन क्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनप्रसंगी सुधीर पाटील म्हणाले की, ओलम शुगर्सने युनिट हेड एस. राधाकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यामार्फत माती परीक्षण, सुधारित जातीचे पायाभूत व प्रमाणीत ऊस बेणे अत्यल्प दरात व २५ टक्के अनुदानावर ऊस रोपांचे वाटप, जमिनीच्या पोषणासाठी १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे राख व मळीचे वितरण असे अनेक उपक्रम चालवले आहेत. याशिवाय कीडनाशक किट, पाण्यात विरघळणारी खते, ड्रोनद्वारे फवारणी, सौरप्रकाश सापळ्यांचे वाटप, विविध कृषी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले जात आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विभागीय कार्यालयात संपर्क साधावा. अनिल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. ऊस विकास अधिकारी नामदेव पाटील, भागोजी लांडे, राजू सुतार, विलास पाटील, अर्जुन मोरे, जगदीश पाटील आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here