कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्यावतीने ऊसतोडणी वाहतूक स्पर्धेचे बक्षीस वितरण

कोल्हापूर: शाहूनगर, परिते येथे भोगावती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणी वाहतूक स्पर्धेच्या बक्षीस वितरण व आगामी हंगामातील ऊस तोडणी. वाहतुकीच्या कराराचा कार्यक्रम झाला. यावेळी ऊसतोडणी वाहतूक केसरी स्पर्धेतील विजेते रूपाली किरूळकर (सिंगल), दीपक जाधव (डबल), संदीप गोंगाणे (छकडी) यांना गौरवण्यात आले. साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील म्हणाले की, भोगावती कारखान्याला ‘एनसीडीसी’ कडून भरीव अर्थसहाय्य सहाय्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी हंगामात भोगावती साखर कारखाना सक्षमपणे चालवणार आहोत. सर्वांनी हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. यावेळी उपाध्यक्ष राजाराम कवडे, सागर पाटील, संजय पाटील, शशिकांत पाटील, प्रदिप पाटील उपस्थित होते. उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here