लातूर : अंबुलगा कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक दर देणार – संभाजी पाटील निलंगेकर यांची घोषणा

लातूर : अंबुलगा कारखान्याच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात झाला. यावेळी माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, निलंगा ओंकार शुगर लिमिटेडचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील, नगराध्यक्ष संजयराज हलगरकर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत होरे आदी उपस्थित होते. यंदाचा गळीत हंगामामध्ये कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर कारखान्यांपेक्षा सर्वाधिक भाव देणार आहे, अशी घोषणा संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली. बाबूराव बोत्रे यांनी मागील दोन-तीन वर्षांत कारखाना यशस्वीपणे चालवला आहे. गेल्यावर्षी ३,१५० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना देणार असल्याचे जाहीर करून उर्वरित २५० रुपयांचा वाढीव हप्ता आणि ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना मोफत साखर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील म्हणाले की, गाळपास ऊस दिल्यानंतर अवघ्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैशांची रक्कम जमा होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये, तसेच शेतकरी सक्षम आणि सदन व्हावा, यासाठीच हे युनिट उभे करण्यात आले असून भविष्यातही शेतकऱ्यांना उच्चांकी भाव देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. आमदार निलंगेकर यांनी ओंकार शुगर ही संस्था विविध राज्यांमध्ये ३४ साखर कारखाने यशस्वीपणे चालवते. भविष्यात ५० कारखाने चालवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून सध्या कारखान्यांच्या माध्यमातून ३१ हजार कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. १४ लाख शेतकरी या कारखान्यांचा लाभ घेत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात कृषी अधिकारी आपेट यांनी सूत्रसंचालन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here