लातूर : रेणा कारखान्यात मिल रोलर पूजन उत्साहात, गळीत हंगामाची जय्यत तयारी

लातूर : रेणा सहकारी साखर कारखान्याच्या मिल विभागातील महत्त्वाच्या टप्प्याचा भाग असलेल्या मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे संस्थापक दिलीपराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांच्या हस्ते झाला. कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर (देशमुख), व्हाइस चेअरमन अॅड. प्रवीण पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष तथा संचालक आबासाहेब पाटील, रेणाचे माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाइस संतोष चेअरमन प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीला गुरुवारी औपचारिक सुरवात करण्यात आली. कारखान्यात यंत्रसामग्रीची दुरुस्ती, देखभाल व आधुनिकीकरणाची कामे केली जात आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा देत ऊस गळीत सुरळीत पार पाडण्यासाठी कारखाना प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. गळीत हंगामासाठी सर्व यंत्रसामग्रीची दुरुस्ती, देखभाल व आधुनिकीकरणाची कामे संदर्भात तयारी करण्यात आली आहे. नियोजित वेळेत गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली. दिलीप पाटील नागराळकर, सभापती उमाकांत खंलने, उपसभापती शेषेराव हाके, यांच्यासह कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, संग्राम माटेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, संभाजी रेड्डी, तानाजी कांबळे, तुकाराम कोल्हे, शंकरराव पाटील, सतीश पवार, गोविंद पाटील, रणजित पाटील, वैशालीताई माने, अमृताताई देशमुख, तक्रार निवारण समिती सदस्य, उमाकांत देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य प्रकाश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here