लातूर : निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून ४७.७० कोटींचे ऊस बिल अदा

लातूर : बंद अवस्थेतील औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना आमदार अभिमन्यू पवार यांच्या अथक प्रयत्नातून पुन्हा सुरू झाला. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना मिळाला आहे. वाहतूक खर्चात बचत आणि वेळेवर ऊसबिल मिळाल्याने आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होत आहे. आता कारखान्याकडून २२ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत प्रति मे. टन २७०० रुपयांप्रमाणे एकूण ४७ कोटी ७० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. चालू गळीत हंगामातील ऊस बिलाची रक्कम जमा करण्यात आली आहे.

श्री निळकंठेश्वर कारखान्याकडून १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत ऊस पाठविणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति टन २७०० रुपयांप्रमाणे २३ कोटी ३५ लाख रुपये वर्ग करण्यात आले. त्यापूर्वी २२ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत गाळप झालेल्या उसासाठी सुमारे २४ कोटी ३५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरही ऊसबिलाची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती आ. अभिमन्यू पवार यांनी दिली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here