लातूर : ‘ट्वेंटीवन’कडून ऊस बिलाचे वाटप सुरू, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

लातूर : आमदार अमित देशमुख यांच्या मालकीच्या ट्वेंटीवन शुगर लिमिटेड या साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले चार महिन्यांपासून थकवली होती. राष्ट्रीय किसान मोर्चाने बुधवारी (ता. 1) कारखान्याला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. शनिवारी (ता. 5) मोर्चाच्या वतीने कारखान्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर कारखान्याकडून ऊसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली

मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन दोन दिवसात ऊसाची बिले न दिल्यास शनिवारी कारखान्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शनिवारी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मध्यस्थीने देशमुख व मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुन्हा बैठक झाली. त्यातही देशमुख यांनी सोमवारपासून बिले देण्याची तसेच मार्चपर्यंतची सर्व ऊसबिले एप्रिलअखेपर्यंत देण्याची हमी देत विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र, मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन द्या किंवा शेतकऱ्यांसमोर येऊन भूमिका मांडण्याचा आग्रह धरला. पाऊण तासाच्या चर्चेनंतर देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांच्या दोन्ही मागण्यांसाठी तयारी दाखवली नाही. शेवटी शनिवारी दुपारी बारापासून पदाधिकाऱ्यांनी कारखान्यासमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली. आंदोलनात लातूर, बीड व नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here