सातारा जिल्ह्यातील कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी, सांगलीत उमेदवारांची चाचपणी

सांगली : कराड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सत्तारुढ आणि विरोधी पॅनलकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. नेते आणि इच्छुक उमेदवारांनी संपर्क वाढवला आहे. सभासदांची संख्या अधिक असलेल्या सांगली जिल्ह्यातील बोरगाव, रेठरे हरणाक्ष या गटांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील या गटात कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्यावेळी कृष्णा कारखान्याची निवडणूक तिरंगी झाली. मात्र, सहकार पॅनेल विरुद्ध संस्थापक पॅनेल यांच्यातील अटीतटीचा सामना ठरला. त्यावेळी भोसले यांचे पॅनेल सत्तेवर आले.

रेठरेहरणाक्ष बोरगाव गटात डॉ. सुरेश भोसले यांच्याकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू आहेत. या पॅनेलकडून संजय पाटील, भगवान पाटील (उरूण ईश्वरपूर), सुनील पाटील, एम. के. जाधव (कामेरी) आणि जितेंद्र पाटील (बोरगाव), जी. डी. मोरे (रेठरेहरणाक्ष) हे इच्छुक आहेत. तर बोरगाव रेठरेहरणाक्ष गटात संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांनी संपर्क केला असून युवराज पाटील, शिवाजी पवार, राजवर्धन पाटील, हेमंत पाटील (ईश्वरपूर), पोपट कदम (कामेरी) हे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी अविनाश मोहिते सभासदांच्या गाठीभेटी घेत असून या संपर्क दौऱ्यात त्यांनी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे अशी माहिती दिली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here